कन्नड तालुक्यातील रेलगाव तांडा येथे भीषम अपघात या अपघातात तीन जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Foto
 

औरंगाबाद : यात्रेवरून परत गावाकडे जात असताना भरधाव ट्रकने समोरून दुचाकीला धडक दिली. या अपघातात चार वर्ष चिमुकलीसह दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कन्नड तालुक्यातील रेलगाव तांडा येथे घडली.अनुसया संदीप गायकवाड (वय ४ वर्ष), संदीप बाळू गायकवाड (वय २७ वर्ष) व प्रमोद गायकवाड (वय ३० वर्ष) सर्व राहणार अंधानेर तालुका कन्नड असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, संदीप गायकवाड हे मित्रासह चिमुकलीला घेऊन कन्नड तालुक्यातील औराळा येथे यात्रेसाठी गेले होते. सायंकाळी यात्रेवरून परत अंधानेर च्या दिशेने निघाले होते. ते परत येत असताना रेलगाव तांडा येथे समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की अपघात होताच दुचाकीवरील तीघेही रस्त्याच्या कडेला जोराचे आपटले होते. यात प्रमोद हा जागीच ठार झाला होता. संदीप व अनुसया यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. अपघातग्रस्त ट्रक चालक यांना कन्नड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.